बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलियाचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे आलिया भट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यातच आलियाने स्वत:साठी एक नवी कोरी आलिशान गाडी खरेदी केली आहे.
आलियाने नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर काळ्या रंगाची रेंज रोव्हर घेतली आहे. आलियाने खरेदी केलेल्या रेंज रोव्हरच्या ऑटोबायोग्राफी लॉन्ग व्हील बेसची किंमत 3.81 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. या नव्या कोऱ्या गाडीचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये गाडीची पुजा झाल्याचेदेखील दिसत आहे.
आलिया महागड्या कारची शौकीन आहे. तिच्याकडे लग्झरी सेडान बीएमडब्ल्यू ७ सीरीज ही महागडी गाडी आहे. ऑडी ए६ सेडान आणि सुपर लग्झरी एसयूव्ही ऑडी क्यू ५ या गाड्या सुद्धा तिच्याकडे आहेत. तर ९० लाख रुपये किंमत असेलली आणखी एक लग्जरी एसयूव्ही ऑडी क्यू ७ आलियाकडे आहे. आलिया भटच्या या आलिशान कार कलेक्शनमध्ये आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे.
सध्या आलिया यशाच्या शिखरावर आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यात ती एक-एक पाऊल ती पुढे टाकत आहे. गेल्या वर्षीच तिने मुलीला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर तिचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा हिट झाला. तर आता धर्मासोबत मिळून ती स्वत:च्या प्रोडक्शन बॅनरखाली "जिगरा" नावाचा सिनेमा घेऊन येत आहे. ज्यामध्ये ती स्वत: मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी रिलीज होणार आहे. 'जिगरा'साठी चाहत्यांमध्ये उत्सुकता ताणली आहे.