Join us

आलिया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक; विदेश दौरा रद्द करत अभिनेत्री पोहोचली रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 16:08 IST

Alia bhatt: नरेंद्र राजदान हे ९५ वर्षांचे आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhatt)हिचे आजोबा नरेंद्र राजदान (narendra razdan) यांची प्रकृती चिंताजनक आहे. नरेंद्र राजदान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती खालावली आहे. आजोबांच्या प्रकृतीची माहिती मिळताच आलियाने तिचा विदेश दौरा रद्द करत विमानतळावरुन थेट रुग्णालय गाठलं आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'नुसार, सोनी राजदान (soni razdan) यांचे वडील नरेंद्र राजदान हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. ते ९५ वर्षांचे असून काही दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, नरेंद्र राजदान यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे आलियासह भट्ट कुटुंबातील अनेक सदस्यांची त्यांचे कार्यक्रम रद्द केले आहेत, असं सांगण्यात येतं. आलिया तिच्या  ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. याच सिनेमासाठी ती विदेश दौऱ्यावर जात असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, तिला अर्ध्या वाटेवरुन परत यावं लागलं आहे.
टॅग्स :आलिया भटसेलिब्रिटीबॉलिवूड