Join us

Alia Bhat Grandmother : आलिया भटसारखीच ग्लॅमरस आहे तिची आज्जी, सोनी राजदान यांनी शेअर केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 12:29 IST

सध्या त्या 94 वर्षांच्या असून त्यांचा आत्ताचाही लेटेस्ट फोटो पोस्ट केलाय

अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhat) तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रत्येकाचंच मन जिंकलं आहे. काही महिन्यांपूर्वीच आलियाने लेकीला जन्म दिला आणि ती पुन्हा त्याच जोमाने कामावर परतली आहे. आलिया सध्याची अतिशय फिट आणि तितकीच ग्लॅमरस अभिनेत्री आहे. आलियाचं हे सौंदर्य कदाचित तिला आज्जीकडूनच मिळालंय. होय आलियाची आजी म्हणजेच सोनी राजदान (Soni Razdan) यांची आई त्याकाळी सुद्धा अतिशय बोल्ड दिसायच्या.

सोनी राजदान यांनी त्यांच्या आईचे तीन फोटो शेअर केले आहेत. 'मदर्स डे' निमित्त त्यांनी आईच्या फोटोंची झलक दाखवली आहे. सोनी राजदान यांची आई गर्ट्रूड  होल्जर जर्मनची आहे. त्यांच्या तरुणपणीचा एक बोल्ड फोटो त्यांनी पोस्ट केलाय. सध्या त्या 94 वर्षांच्या असून आत्ताचाही लेटेस्ट फोटो त्यांनी पोस्ट केलाय.

"आई तेव्हाही रॉकस्टार होती, आजही आहे आणि नेहमीच राहील" असं कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिलंय. आलिया तिच्या आजी आजोबांच्या खूप जवळ आहे. अनेकदा तिने त्यांच्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

टॅग्स :आलिया भटबॉलिवूडव्हायरल फोटोज्परिवार