मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या तरुणाईसाठी आयकॉन ठरत आहे. इतक्या कमी वयात आणि अल्पावधीतच तिने खूप आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सिनेमासोबतच आलिया समाजसेवेतही योगदान देत असते. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या काही आवडत्या वस्तूंचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता.
या लिलावातून मिळणारे पैसे तिने एका चॅरिटी संस्थेला दिले. ही संस्था बेकार झालेल्या प्लॅस्टिकच्या बॉटल रिसायकल करून ज्यांच्याकडे वीज नाहीये त्यांच्यासाठी सौरऊर्जेची निर्मिती करते. आलियाच्या या मदतीमुळे 40 परिवारांच्या घरातील अंधार दूर झाला आहे.
आलियाकडून लिलाव करण्यात आलेल्या कपड्यांमधून, वस्तूंमधून जे पैसे मिळाले, त्यातून कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यातील किकेरी गावातील 40 परिवारांना वीज देण्यासाठी वापरण्यात आले.
या प्रोजेक्टबाबत आलिया म्हणाली की, 'भारतात अजूनही असे अनेक परिवार आहेत, जे अजूनही अंधारात राहतात. Liter Of Light चे इको-फ्रेन्डली सोलर लॅम्प्स अशा घरांना प्रकाशमय करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे'.