Join us

छोट्या पर्सची मोठी चर्चा... आलिया भटची बॅग आहे खूपच महाग, किंमत ऐकून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 15:28 IST

आलिया स्टायलिश आउटफिटसह नो मेकअप लूकमध्ये दिसली.

अभिनेत्री आलिया भट  ही नेहमीच तिच्या स्टाइल आणि लूकमुळे चर्चेत असते. तिच्या कपड्यांची स्टाईल नेहमीच काहीतरी वेगळी असते. परंतु यावेळी आलिया तिच्या पर्समुळे चर्चेत आली आहे. कारण तिच्याकडे असलेली पर्स ही लाखमोलाची होती. या पर्सची किंमत ऐकाल तर तुम्हाला कदाचित चक्कर येईल. कारण या पर्सच्या किमतीने एखाद्या सर्वसामान्याला घर खरेदी करता येईल. नुकतेच आलिया एअरपोर्टवर दिसली, यात आलियाच्या बॅगने लक्ष वेधलं आहे

आलिया आज  मुंबई विमानतळावर दिसून आली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाला लंडनमध्ये 'होप गाला' होस्ट करण्याची संधी मिळाली आहे, ज्यासाठी ती आज रवाना झाली. यावेली आलिया भट्ट डेनिम लूकमध्ये दिसली. आलियानं कानात छोटे झुमकेही घातले होते. आलिया स्टायलिश आउटफिटसह नो मेकअप लूकमध्ये दिसली. यावेळी लक्ष वेधलं ते आलियाच्या बॅगने.  एक काळ्या रंगाची पर्स तिने हातात घेतली आहे. 

आकाराने लहान असलेल्या या पर्सचे मूल्य कदाचित कोणाच्या लक्षात येणार नाही, परंतु ही पर्स लाख मोलाची आहे. या पर्सची किंमत साधारणपणे 2,07,564 असल्याचं म्हंटलं जात आहे. इटलीमध्ये बनवलेली ही विशेष टोट बॅग 'गुच्ची' या लेबलची होती.  ही पर्स ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर 'गुच्ची जंबो जीजी टोट बॅग' म्हणून उपलब्ध आहे. या पर्सने तिच्या स्टायलीश लूकमध्ये आणखी भर टाकली. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'जिगरा'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती बैजू बावरा आणि लव्ह अँड वॉरमध्येही दिसणार आहे. 

टॅग्स :आलिया भटसेलिब्रिटीबॉलिवूड