Alia Bhatt Pregnancy: अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) व अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) गेल्या 14 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले आणि लग्नाला उणेपुरे दोन महिने होत नाही तोच आलियाने गुडन्यूज शेअर केली. आलिया व रणबीर लवकरच आईबाबा होणार आहेत आणि आता आलियाच्या प्रेग्नंसीबद्दल एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. होय, आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असं मानलं जात आहे आणि खास म्हणजे, करण जोहरच्या (Karan Johar) एका वक्तव्याने या चर्चांना खतपाणी घातलं आहे.
करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 7’च्या (Koffee With Karan 7) पहिल्या एपिसोडमध्ये आलिया आणि रणवीर सिंग गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. या एपिसोडमध्ये आलियाने अनेक खुलासे केलेत. अगदी लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून रणबीरनं तिला कधी, कुठे प्रपोज केलं होतं, इथपर्यंतचे अनेक खुलासे तिने केलेत. शिवाय करण जोहरबद्दलही ती बोलली. मी लग्नाबद्दल सांगितल्यावर करण रडला होता, असं ती म्हणाली. हे सांगताना आलिया म्हणाली, ‘मी जेव्हा आमच्या लग्नाबाबत सांगण्यासाठी करणच्या ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा करणचा ‘बॅड हेअर डे’ होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि त्यामुळे वैतागून तो हेअर कॅप घालून बसला होता. मी त्याला सर्व गोष्ट सांगितली. लग्न करणार असल्याचा निर्णय सांगितला, तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदाने त्याला रडू आलं.’आलियाने ‘कॉफी विद करण 7’च्या एपिसोडमध्ये सांगितलेला हाच किस्सा करण जोहरनेही सांगितला होता. पण एका वेगळ्या संदर्भाने आणि याचमुळे आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असा अंदाज अनेकांनी बांधला आहे.
आलियाने ‘कॉफी विद करण 7’मध्ये सांगितलेला किस्सा करणनेही सांगितला होता. फरक इतकाच की,त्याने आलियाच्या प्रेग्नंसीबद्दल बोलताना हा किस्सा सांगितला होता. आलियाने गुड न्यूज दिल्यानंतर करण माध्यमांशी बोलला होता. ‘आलिया ऑफिसमध्ये आली तेव्हा मी हेअर कॅप घालून बसलो होतो. त्यावेळी तिने मला गुडन्यूज सांगितली. आलिया माझी मानलेली मुलगी आहे. माझ्या बाळाला बाळ होणार हे ऐकून मला आनंदाने रडू कोसळलं...,’ असं करण म्हणाला होता. आता चाहते आलिया व करणने सांगितलेल्या याच दोन्ही वक्तव्यांना जोडून आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असा अंदाज बांधत आहेत.