Join us

'बाहुबली' दिग्दर्शक राजामौली यांच्या 'RRR' मधून आलियाचा पत्ता कट? प्रियांका चोप्राने मारली बाजी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 15:37 IST

राजामौली यांच्या या बहुचर्चीत सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. अशात आता काही हैराण करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत.

साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि 'बाहुबली' - 'मगधीरा'सारखे सिनेमे देणारे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आगामी बिग बजेट 'ट्रिपल  आर' हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत आहे. काही दिवासांपूर्वीच कोरोनाला मात देऊन सिनेमाच्या कामात बिझी झाले आहेत. या सिनेमा तेलुगू सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार ज्यूनिअर एनटीआर आणि राम चरण यांच्या मुख्य भूमिका आहेत. एनटीआर आणि रामचरण पहिल्यांदाच एका सिनेमात एकत्र काम करणार आहेत.

राजामौली यांच्या या बहुचर्चीत सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलं आहे. अशात आता काही हैराण करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. आता अशी चर्चा सुरू आहे की, 'आरआरआर' सिनेमातून आलिया भट्टचा पत्ता कट झालाय. कारण ती इतर सिनेमामुळे या सिनेमाच्या शूटींगसाठी वेळ देऊ शकत नाहीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता असं समजतंय की राजामौली यांच्या या सिनेमात अभिनेत्री प्रियांका चोप्राला आलियाच्या जागी घेण्याची योजना केली जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, आलिया भट्टने आधीच राजामौली यांना सिनेमा सोडणार असल्याची माहिती दिली होती. आता दिग्दर्शक राजामौली यांनी रामचरणसाठी अभिनेत्री शोधण्याचं काम सुरू केलंय. अशात ही चर्चा सुरू आहे की, रामचरणच्या अपोझिट प्रियांका चौप्राची निवड केली आहे. याआधी प्रियंका चोप्रा आणि रामचरण 'जंजीर' सिनेमात एकत्र दिसले होते. 

दरम्यान ब्रिटीश अभिनेत्री ओलिविया मॉरिस या सिनेमात ज्यूनिअर एनटीआरसोबत रोमान्स करण्यासाठी तयार झाली आहे. आता केवळ या सर्व गोष्टींची राजामौली यांनी अधिकृत घोषणा करावी याची वाट त्यांचे फॅन्स बघत आहेत. महत्वाची बाब म्हणजे या सिनेमात बॉलिवूडचा सिंघम अजय देवगन याचीही मुख्य भूमिका असणार आहे.

हे पण वाचा :

Confirm : 'आदिपुरूष'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणार प्रभास, पण सीता कोण होणार?

बिपाशाने सांगितला इंडस्ट्रीचा खरा चेहरा, जेव्हा एका मोठ्या प्रोड्युसरने केला होता विचित्र मेसेज!

Hotness Alert! Disha Patani चा हा बोल्ड अंदाज पाहून वातावरण 'तापलं' फोटो झाले व्हायरल!

टॅग्स :आलिया भटप्रियंका चोप्राएस.एस. राजमौली