Join us

Alia Bhatt Pregnacy : आलिया भटच्या प्रेग्नेंसीबद्दल झाला मोठा खुलासा, समोर आली डिलेव्हरी डेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 12:20 IST

Alia Bhatt Pregnacy : सध्या आलिया भट 'डार्लिंग्स' चित्रपट आणि तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. दरम्यान, ती तारीखही समोर आली आहे ज्या दिवशी आलिया मुलाला जन्म देणार आहे.

बॉलिवूडमधील स्टार कपल आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे वर्षभर चर्चेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा होती. त्यानंतर अचानक दोघांनीही कोणतीही घोषणा न करता लग्न केले. त्यानंतर आलियाने लग्नानंतर तीन महिन्यांतच प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले. सर्व काही इतक्या वेगाने घडले की हे जोडपे सतत लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, ती तारीखही समोर आली आहे ज्या दिवशी आलिया मुलाला जन्म देणार आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या मुलाबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. नुकतेच आलिया भटने पहिल्यांदाच तिचा बेबी बंप दाखवून लोकांची उत्सुकता वाढवली आहे. आलिया नुकतीच रणबीरसोबत शॉर्ट ब्राउन ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली. हे फोटो पाहून सोशल मीडिया यूजर्स कमेंटमध्ये म्हणत आहेत की, आलिया ५ महिन्यांची प्रेग्नंट आहे. आता प्रत्येकाला अभिनेत्रीची डिलेव्हरीची तारीख जाणून घ्यायची आहे.

हे फोटो समोर आल्यानंतर आता आलिया आणि रणबीरच्या मुलाच्या डिलेव्हरीची तारीखही समोर आली आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, एका सूत्राने खुलासा केला आहे की आलिया भट सध्या ४ महिन्यांची प्रेग्नेंट आहे आणि या जोडप्याला डिसेंबरमध्ये बाळ होण्याची शक्यता आहे. पुढे, सूत्रांनी सांगितले की, 'रणबीर आणि आलियाने प्रसूतीसाठी हॉस्पिटल बुक केले आहे. खार येथील सर्वात लोकप्रिय रुग्णालयात तिची डिलेव्हरी होईल. सध्या आलियाची कोविड चाचणी देखील दर काही दिवसांनी नियमितपणे केली जात आहे, जरी धोका नगण्य आहे, परंतु या प्रसंगी हे जोडपे आवश्यक ती खबरदारी घेत आहे.

सध्या आलिया आणि रणबीर दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहेत. आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माआधी हे दोघेही त्यांच्या पहिल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. 'ब्रह्मास्त्र' ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. आलिया, रणबीर आणि चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याआधीच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर