Join us  

Alia Bhatt Daughter: लेकीबाबत आलिया आणि रणबीर कपूरने घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 4:14 PM

Alia Bhatt Daughter: कपूर घराण्याच्या राजकुमारीची पहिली झलक पाहण्यासाठी सगळेच आतूर आहेत.

आलिया भट (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) च्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं  आहे. आलियाने 6 नोव्हेंबर रोजी गोंडस कन्येला (Alia Bhatt daughter)  जन्म दिला. कपूर घराण्याच्या राजकुमारीची पहिली झलक पाहण्यासाठी सगळेच आतूर आहेत. पापाराझींनी रूग्णालयाबाहेर गर्दी केली होती. आलिया व रणबीरची गाडी बाहेर पडताच पापाराझींनी एकच गर्दी केली. रणबीरने आपल्या लेकीला छातीशी कवटाळलं होतं. त्यामुळे चिमुकलीची झलक पाहायला मिळाली नाही. आपल्या बाळाचा फोटो कोणीही क्लिक करू नये असे या दोघांचं मतं आहे.  बाळाला भेटण्यासाठी अनेक पाहुणे रुग्णालयात पोहोचले होते, परंतु त्यापैकी अनेकांना बाळाला भेटण्याची परवानगी मिळाली नाही. 

 बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, आलिया भट आणि रणबीर कपूरच्या एका जवळच्या मित्राने खुलासा केला आहे की बाळाचं फोटो कुणीही क्लिक करु नये असं कुटुंबातील व्यक्तिना वाटतं. रणबीर आणि आलियाला त्यांच्या मुलीचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ द्यायचा नाही. यासोबतच नुकत्याच जन्मलेल्या बाळाला संसर्ग होण्याचा धोका असतो. 

एका जवळच्या मित्राने सांगितले की, करण जोहरही मुलीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला नाही. कारण तो नुकताच लंडनहून भारतात परतला आहे, त्यामुळे तो मुलीला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने COVID टेस्ट केली. टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच तो तिला भेटायला आला.  या दोघांनी आधीच ठरवले होते की, सध्या आपल्या मुलीचा चेहरा कोणाला दाखवायचा नाही. 

आलिया व रणबीरने याचवर्षी एप्रिल महिन्यात लग्न केलं. अगदी मोजक्या कौटुंबिक सदस्यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाची जोरदार चर्चा झाली. लग्नानंतर उण्यापुºया दोनच महिल्यात या जोडप्यानं गुडन्यूज शेअर केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर