Alia Bhatt Ranbir Kapoor Net Worth: बॉलिवूडची सर्वात चर्चित कपल कोणतं तर आलिया भट (Alia Bhatt )आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor). 2018 पासून एकमेकांना डेट करत असलेलं हे जोडपं लवकरच लग्न करणार असल्याचं मानलं जातं आहे. या लग्नाचा योग येईल तेव्हा येईल. पण तूर्तास आम्ही या कपलच्या नेटवर्थबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. रणबीर श्रीमंत की आलिया? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर त्याचं उत्तर आहे, रणबीर. होय, रणबीरची नेटवर्थ आलियापेक्षा दुप्पट आहे.
रणबीर कपूर बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या अभिनेत्यांपेक्षा एक आहे. आलिया सुद्धा कमी नाही. उण्यापुऱ्या 23-24 व्या वर्षी आलिया कोट्यावधी रूपयांची मालकीण आहे. पण संपत्तीच्या बाबतीत रणबीर आलियापेक्षा बराच पुढे आहे.
एका रिपोर्टनुसार, 2021 मध्ये रणबीर कपूरची नेटवर्थ 337 कोटी होती. चित्रपटांतून रणबीर बक्कळ कमाई करतोय. शिवाय जाहिरातींमधूनही कोट्यावधी रूपये कमावतो. एका जाहिरातीसाठी तो सुमारे 5 कोटी चार्ज करतो. तर एका सिनेमासाठी 7 ते 8 कोटी फी घेतो. रणबीर कपूरकडे एकापेक्षा एक अलिशान महागड्या गाड्यात आहेत. बीएमडब्ल्यू एक्स 6, लेक्सस, मर्सिडीज बेन्ज, जीएल क्लास, ऑडी आर 8, रेंज रोव्हर अशा अनेक महागड्या गाड्या त्याच्याकडे आहेत. मुंबईतील वांद्रेभागात त्याचं स्वत:चं घर आहे. त्याची किंमत 30 कोटींपेक्षा जास्त आहे.
आलियाचे म्हणाल तर तिची नेटवर्थ 158 कोटी आहे. प्रत्येक चित्रपटासाठी ती 5 ते 8 कोटी रूपये घेते आणि काही मिनिटांच्या जाहिरातीसाठी 2 ते 3 कोटी चार्ज करते. इव्हेंटमध्ये सामील होण्यासाठी ती सुमारे 30 लाख रूपये घेते. 2019 मध्ये आलियाने स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस उघडलं. आलियाकडे लंडनमध्ये स्वत:चं घर आहे. शिवाय मुंबईतही दोन घरं आहेत. आलियाकडे रोव्हर इवोक, ऑडी ए 6, क्यू 5, बीएमडब्ल्यू 7 अशा अलिशान गाड्या आहेत.