Alia Bhatt Baby Name: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव अतिशय सुंदर ठेवले आहे. आलियाने सोशल मीडियावर तिच्या बाळाच्या नावाची पोस्ट शेअर केली आहे. आलियाने सांगितले की, तिच्या मुलीचे हे गोंडस नाव तिच्या आजीने म्हणजेच नीतू कपूरने ठेवले आहे. आलिया आणि रणबीरच्या या प्रिय व्यक्तीला त्यांनी काय नाव दिले आहे ते जाणून घेऊया.
आलियाने एक अस्पष्ट फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची मुलगीही तिच्या आणि रणबीरसोबत आहे. मुलगी रणबीरच्या मांडीवर दिसते. तो मुलीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवताना दिसतो. या फोटोसोबत आलियाने मुलीच्या नावाचीही माहिती दिली आहे.
आलियाने सांगितलं नाव अन् त्याचे अर्थ
आलिया म्हणाली, 'तिचं नाव आहे राहा (तिच्या आजीने हे नाव निवडले आहे). याचे खूप सारे चांगले अर्थ आहेत.राहा म्हणजे दैवी मार्ग,स्वाहिलीमध्ये याचा अर्थ आनंद,राहाचा संस्कृतमधील अर्थ कुळ, वंश, घराणे असे म्हणता येईल.बंगालीत याचा अर्थ आराम किंवा कम्फर्ट (comfort) म्हणतात.अरबी भाषेत याचा अर्थ शांतता असा होतो आणि या सर्वांव्यतिरिक्त याचा अर्थ आनंद, स्वातंत्र्य आणि कल्याण असा होतो. आणि तिच्या नावाप्रमाणेच आपल्याला हे सर्व पहिल्या क्षणापासून जाणवत आहे.
यासोबत आलियाने लिहिले आहे की, राहा, आमच्या कुटुंबात आयुष्य भरल्याबद्दल धन्यवाद. जणू काही आमची लाईफ आताच सुरू झाली आहे. आलियाच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील मित्रांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. आलिया आणि रणबीरचे लग्न याच वर्षी १४ एप्रिलला झाले होते. लग्नाच्या जवळपास २ महिन्यांनंतर आलियाने सोशल मीडियावर गरोदर असल्याची गोड बातमी शेअर केली. आता ७ नोव्हेंबरला आलियाने एका मुलीला जन्म दिला. तेव्हापासून आलिया आणि रणबीर आपल्या मुलीचे नाव काय ठेवणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती.