Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा (Vijay Verma) आणि शेफाली शाह (Shefali Shah) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आलिया तिच्या पर्सनल लाइफसोबतच प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत असते. आलिया आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी एप्रिलमध्ये लग्न केले आणि जूनमध्ये त्यांनी आलियाच्या प्रग्नेंन्सी बातमी दिली. प्रेग्नेंसीमुळे आलिय ट्रोलही झाली आहे. करिअर पीकवर असताना तिने आई होण्याचा निर्णय का घेतला, असे अनेकजण म्हणत आहेत. तिला ट्रोल करणाऱ्यांना आलियाने आता उत्तर दिले आहे.
आलियाने एका मुलाखतीत ट्रोलर्ससोबत आई होण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने बोलली. एका मुलाखतीत, आलिया म्हणाली- काही स्त्रियांना काहीही केलं तरी त्याची हेडलाईन होते. मग ती आई होणार असेल किंवा कुणाला डेट करते किंवा व्हॅकेशनवर गेली असले. त्यांची नजर कायम स्त्रियांवर असतात.
कमी वयात आई का झालीलहान वयात आई होण्याच्या निर्णयावर आलिया म्हणाली - मला माझ्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफ बॅलेंस कशी करायची ते माहिती आहे. ते जाऊ द्या, कधीकधी आपण काहीही प्लान करत नाही परंतु सर्वकाही आपोआप घडते.
आलिया पुढे म्हणाली- लोकांचा दृष्टीकोन बदलतो आहे याचा तिला आनंद आहे. ते अनेक आर्टिकल वाचले ज्या तिला सपोर्ट केला होता. आता काळ बदलला आहे आणि आपण नको त्या लोकांकडे लक्ष देऊ नये.
आलियाच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर डार्लिंग्स हा चित्रपट ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यानंतर ती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.