Join us

Animal च्या प्रीमिअरला रणबीर कपूर कुटुंबासोबत दिसला, आलियाने दिली पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 09:41 IST

शो संपल्यानंतर पापाराझींनी आलिया भटला सिनेमा आवडला का? असा प्रश्न विचारला.

रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षित सिनेमा 'Animal' आज रिलीज झाला आहे. कालच मुंबईतल्या बीकेसी येथे सिनेमाचा प्रिमिअर शो आयोजित केला होता. प्रिमियरसाठी रणबीर कपूरचं अख्खं कुटुंब पोहोचलं होतं. पत्नी आलिया, आलियाची बहीण शाहीन भट, आई सोनी राजदान आणि रणबीरची आई नीतू कपूर असे सर्वच रणबीरला पाठिंबा देण्यासाठी हजर होते. शो संपल्यानंतर पापाराझींनी आलिया भटला सिनेमा आवडला का? असा प्रश्न विचारला. यावर आलियाची मजेशीर प्रतिक्रिया होती.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती आलिया भट पती रणबीर कपूरला पाठिंबा देण्यासाठी Animal च्या स्क्रीनिंगला पोहोचली.तिने रणबीर कार्टुन असलेला व्हाईट शर्ट आणि वर ब्लॅक ब्लेझर घातलं होतं. आलियाचा एकदम स्टायलिश लूक यावेळी पाहायला मिळाला. शो संपल्यानंतर आलिया बहीण शाहीन आणि आई सोनी राजदान यांना सुरक्षितपणे गाडीकडे नेत होती. यावेळी पापाराझींनी आलियाला 'सिनेमा कसा वाटला?' असा प्रश्न विचारला. यावर आलिया म्हणाली, 'खतरनाक...खतरनाक'.

Animal प्रिमिअर शोचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या स्क्रीनिंगला बॉबी देओलही पत्नी आणि लेकासोबत आला होता. तर रश्मिका मंदाना, अनिल कपूरही पोहोचले होते. अॅनिमल सिनेमा रणबीर आणि बॉबी दोघांच्या करिअरमधील माईलस्टोन असून शकतो असा अंदाज आहे. कबीर सिंग फेम संदीप रेड्डी वांगाने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटसिनेमा