Join us

सुप्रसिद्ध अभिनेत्याने दत्तक घेतलेल्या हत्तीला दिलं आलिया भटच्या लेकीचं नाव, अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 18:49 IST

आलिया भटला एका अभिनेत्याने तिच्या लेकीच्या नावावर एक हत्ती गिफ्ट केल्याची खास गोष्ट तिने सांगितली (alia bhatt)

आलिया भट सध्या तिच्या आगामी 'जिगरा' सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. आलिया भट आणि वेदांग रैना या दोघांचा 'जिगरा' सिनेमा पाहायला लोक गर्दी करत आहेत. कालच हा सिनेमा रिलीज झालाय. अशातच सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने आलियाने एक खास किस्सा सांगितलाय. सुप्रसिद्ध अभिनेत्याने आलियाची लेक राहाच्या नावावर एक हत्ती दत्तक घेतला आणि तो आलियाला गिफ्ट केला. हा अभिनेता म्हणजे RRR फेम रामचरण.

रामचरणचं आलियासाठी खास गिफ्ट

आलियाने सविस्तर हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला. रामचरणने एक हत्ती दत्तक घेतला. त्या हत्तीला रामचरणने आलियाची लेक राहाचं नाव दिलं. आलिया याविषयी कृतज्ञता व्यक्त करत म्हणाली की, "ही खूप मजेशीर स्टोरी आहे. राहाच्या जन्मानंतर एक महिन्यांनी मी घराजवळ कुठेतरी चालत होते. तेव्हा अचानक कोणीतरी माझ्याजवळ आलं आणि म्हणालं मॅम रामचरण सरांनी तुमच्यासाठी एक हत्ती पाठवला आहे. मी हे ऐकताच थक्क झाले. काहीही होऊ शकतं. आता मी पुन्हा घराजवळ गेल्यावर मला आमच्या आवारात एक मोठा हत्ती बिल्डिंगजवळ दिसेल अशी मी कल्पना करत होते."

आलिया पुढे म्हणाली, "तर तो खरा हत्ती नव्हता. तो एक लाकडाचा हत्ती होता. रामचरणने जंगलात एक हत्ती राहाचं नाव देऊन दत्तक घेतल्यावर त्याची प्रतिकृती म्हणून लाकडाचा एक हत्ती गिफ्ट त्याने माझ्यासाठी पाठवला होता. रामचरणने केलेली ही गोड गोष्ट माझ्या कायम लक्षात राहील." अशाप्रकारे आलियाने तिच्या भावना व्यक्त केल्या. आलिया भटने रामचरण आणि jr. ntr सोबत RRR या गाजलेल्या सिनेमात अभिनय केलाय. तेव्हापासून त्यांच्यात खास नातं आहे.

टॅग्स :राम चरण तेजाआलिया भटबॉलिवूड