Join us

आलियाने नॅशनल अवॉर्डसाठी लग्नाची साडी का निवडली? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:05 AM

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेल्या आलियाने लग्नातील साडी का नेसली? असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

69th National Film Awards : ६९वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी(१७ ऑक्टोबर) दिल्लीत पार पडला. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. आलिया भट्ट यंदाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलियाला राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलियाने खास लूक केला होता. आलियाच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

आलियाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तिच्या लग्नातील साडी नेसली होती. राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेल्या आलियाने लग्नातील साडी का नेसली? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. आता खुद्द आलियानेच याबाबत खुलासा केला आहे. आलियाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने राष्ट्रीय अवॉर्डसाठी केलेल्या लूकचे काही फोटो शेअर करत यामागचं कारण सांगितलं आहे. 

"खास दिवसासाठी खास आउटफिट गरजेचं असतं. आणि कधीकधी ते आपल्याकडे आधीपासूनच असतं. एकदा स्पेशल असलेली गोष्ट पुन्हा पुन्हा खास होऊ शकते," असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. आलियाबरोबर पती रणबीर कपूरही अवॉर्ड सोहळ्यात उपस्थित होता. या अवॉर्ड सोहळ्यातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आलियाबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनलाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. 'मिमी' या चित्रपटासाठी क्रितीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर 'पुष्पा' चित्रपटातील भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनाल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.  

टॅग्स :आलिया भटराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार