Join us

आलिया भटच्या 'गंगूबाई काठियावाडी' या महिन्यात सुरु होणार शूटिंग! आधी तोडणार होते सेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 18:03 IST

आलिया या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे

संजय लीला भन्साळी यांचा आगामी सिनेमा गंगूबाई काठियावाडीमध्ये मुख्य भूमिका आलिया भट साकारणार आहे.कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे सिनेमाची शूटिंग बंद आहे. या सिनेमासाठी निर्मात्याने गोरेगावच्या फिल्मसिटीमध्ये एक भव्यसेट उभारण्यात आला होता. मात्र लॉकडाऊन शूटिंग थांबले. 

आता महाराष्ट्र सरकारने शूटिंगसाठी परवानगी दिल्यानंतर संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा 'गंगूबाई काठियावाडी'ची शूटिंग सुरु करणार आहेत. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार जूनच्या तिसऱ्या आठवड्यात शूटिंग सुरु होण्याची शक्यता आहे. मेकर्सने आधी सेट तोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता असे नाही होणार आहे. अनेक दिवस असाच सेट उभा असल्यामुळे शूटिंग पूर्वी डागडुजीचे काम करण्यात येणार आहे. शूटिंग सुरु करण्यासाठी मेकर्स महत्त्वाची परवानगी घेतायेत. सगळे ठरल्याप्रमाणे झाले तर शूटिंग जूनच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु करण्यात येईल.  

आलिया या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.आलिया पहिल्यांदाच या चित्रपटातून एका महिला गँगस्टरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे आलियाचा हा चित्रपट तिच्या पुढील करियरसाठी कलाटणी देणारा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :संजय लीला भन्साळीआलिया भट