Join us

Alia Bhatt : आलियाने शेअर केले चिमुकल्या बाळाचे फोटो, चाहते म्हणाले, 'ही तर बेबी राहा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 13:54 IST

अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) तीन महिन्यांपूर्वीच मुलगी 'राहा'ला जन्म दिला. मात्र सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या 'नो फोटो पॉलिसी'नुसार आलिया रणबीरनेही ...

अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) तीन महिन्यांपूर्वीच मुलगी 'राहा'ला जन्म दिला. मात्र सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या 'नो फोटो पॉलिसी'नुसार आलिया रणबीरनेही लेक राहाचा चेहरा माध्यमांसमोर दाखवायचा नाही असा निर्णय घेतला. तरी राहा चे फोटो पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक आहेत. दरम्यान आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या नव्या पोस्टमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. आलियाने काही बाळांचे फोटो शेअर केले आहेत आणि यात राहाचा फोटो असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

आलियाचा स्वत:चा 'एड अ मम्मा' (ED a Mamma) हा लहान मुलांच्या कपड्यांचा ब्रॅंड आहे. या ब्रॅंडच्या जाहिरातीसाठी तिने लहान मुलांचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये 'राहा'चाही फोटो असल्याचा संशय नेटकऱ्यांना आला आहे. कारण आलियाने शेअर केलेल्या फोटोंतील लहान मुलांचं वय हे राहा एवढंच आहे.

आलियाच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस सुरु झाला आहे. एका क्षणासाठी वाटलं की यात आलियाची लेक 'राहा'च आहे अशी कमेंट एकाने केली आहे. सर्वांनाच ही बेबी राहा वाटत आहे, आलियाने कॅप्शनमध्येच डिस्क्लेमर द्यायला हवं होतं अशीही कमेंट चाहत्याने केली आहे.

गेल्या वर्षी १४ एप्रिल रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर काही महिन्यातच आलियाने मुलीला जन्म दिला. जून मध्येच तिने आई होणार असल्याची गुडन्यूज सोशल मीडियावर शेअर केली होती. आलियाने अद्याप राहाचा चेहरा दाखवलेला नाही. 

टॅग्स :आलिया भटसोशल मीडियारणबीर कपूरव्हायरल फोटोज्