Join us  

नणंद-भावजयची जोडी एकत्र दिसणार सिनेमात?, आलिया फोटो पोस्ट करत म्हणाली- कोणीतरी आम्हाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 4:05 PM

आलिया भटने करिनासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते. अलीकडेच आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आलिया भटने तिची नणंद करीना कपूरसोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये आलिया आणि करीना खूपच क्यूट दिसत आहेत. या फोटोंमध्ये आलियाने गुलाबी रंगाचा आउटफिट परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. तर करीना कपूर व्हाईट रंगाच्या आऊटफिटमध्ये अप्सरे सारखी दिसतेय. आलिया भटने करिनासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत.

पहिल्या फोटोमध्ये, आलिया स्वतःला आरशात पाहत आहे, करीना कपूर कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे. दुसऱ्या फोटोत नणंद-भावजया वेगवेगळ्या आरशात एकत्र पोझ देताना दिसतायेत.  तिसर्‍या फोटोमध्ये, करीना कपूर तिची प्रसिद्ध सिग्नेचर पोझ पाऊट करताना दिसतेय तर आलिया तिच्या क्यूट स्माईलने चाहत्यांची मनं जिंकत आहे. ही तीन फोटो शेअर करताना आलिया भटने कॅप्शनमध्ये लिहिले की, "हे आणखी चांगले होऊ शकते का?, P.S- कोणीतरी आम्हाला एकत्र चित्रपटात कास्ट करू शकते, जरी आम्ही सेटवर चर्चा करण्यात आपला जास्त वेळ घालवतो."

करीना कपूर आणि आलिया भट यांच्या फोटोंवर कमेंटचा पाऊस पडला आहे. . या फोटोवर कमेंट करताना, अभिनेता अर्जुन कपूरने लिहिले, "पू स्क्वेअर". करण जोहरने आलियाच्या पोस्टला उत्तर देताना लिहिले, "आम्हाला या कास्टसोबत एक सिनेमा करायला हवा. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर आलियाचा चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' नुकताच प्रदर्शित झाला आहे, तर अभिनेत्री करीना कपूर तिच्या आगामी 'द क्रू' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात करिनासोबत तब्बू आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :आलिया भटकरिना कपूर