Join us

रडूबाई...रडू...! या कारणामुळे आलिया भटला कारण नसताना येते रडू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 14:15 IST

ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. खुद्द आलियाने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. या आजारामुळे आलियाला विनाकारण रडू येते.

ठळक मुद्देआलिया भट सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय ‘कलंक’ या मल्टिस्टारर चित्रपटातही ती झळकणार आहे.

आलिया भटला अलीकडे ‘राजी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरविले गेले. आपल्या छोट्याशा करिअरमध्ये आलियाने अनेक दमदार भूमिका साकारल्या आणि बॉलिवूडचीआघाडीची अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवला. हीच आलिया सध्या एका आजाराने ग्रस्त आहे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. खुद्द आलियाने एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. या आजारामुळे आलियाला विनाकारण रडू येते. कारण नसताना तिच्या डोळ्यांत अश्रू दाटतात. कुणी आलियाला रडूबाई म्हणत असेल, तर यामागे तिचा आजार हेच कारण आहे.

‘मी डिप्रेशनमध्ये नाही. पण मला एंजायटी आहे. हा आजार येत-जात राहतो. गेल्या सहा-सात महिन्यात याचे प्रमाण वाढले आहे. मला एंजायटी अटॅक तर येत नाही. पण यामुळे अनेकदा मला अस्वस्थ वाटायला लागते. कारण नसताना मी रडू लागते. थोड्याच वेळात सगळे काही सामान्य होते. सुरूवातीला मी खूप गोंधळलेली राहायची. यासाठी मी वेगवेगळी कारणे देत फिरायची. कधी मी थकलेय, कधी काम जास्त आहे, वगैरे वगैरे. मग मी यासंदर्भात अनेकांशी बोलले. हे सगळे हळूहळू दूर होईल, असे त्यांनी मला सांगितले. मी सामान्य आहे, असा विचार करण्याची सवय त्यांनी मला लावली,’असे आलियाने यावेळी सांगितले.

माझी लहान बहीण शाहीन डिप्रेशनमधून गेली आहे. त्यामुळे मी याबद्दल अतिशय जागृत असते. मी शाहीनची लढाई जवळून पाहिली, अनुभवली आहे, असेही आलिया यावेळी म्हणाली.आलिया भट सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. याशिवाय ‘कलंक’ या मल्टिस्टारर चित्रपटातही ती झळकणार आहे.

टॅग्स :आलिया भट