आलिया भट संजय लीला भन्साळींच्या आगामी सिनेमा गंगूबाई काठियावाडीला घेऊन चर्चेत आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटिंग अडकले होते. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार आलिया लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
ऑक्टोबरमध्ये सुरु करणार आलिया शूटिंगरिपोर्टनुसार, आलिया गंगूबाई काठियावाडीच्या शूटिंगला ऑक्टोबरपासून सुरुवात करु शकते. ऑक्टोबरमध्ये आलिया पहिलला सोलो सीन शूट करु शकते. सोलो सीन शूट करताना काही ठराविक क्रू मेंबर्स सेटवर असतील. आलिया ऑक्टोबरमध्ये सेटवर येणार असल्याने त्याआधी सेट सॅनेटाईज केला जाईल. शूटिंग सुरु करण्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मेकर्स आलिया भटचे ते सीन्स शूट करणार आहे ज्यात कमी लोकांची गरज लागले. काही चीट्स शॉट्ससुद्धा घेतले जातील, ज्याला नंतप वीएफएक्सच्या मदतीने नीट केले जाईल. मेकर्सना सिनेमातील सीन्ससोबत कोणतीच तडजोड करायची नाही, त्यामुळे सिनेमातील सगळे मोठे सीन्स नंतर शूट करण्यात येतील.
कोण आहे गंगूबाई काठीयावाडी ?आलिया या सिनेमात एका धमाकेदार रुपात महिला गँंगस्टरची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची कथा ही हुसैन जैदी ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेली आहे. पण खरी कथा ही गंगूबाई काठीयावाडी हिच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकानुसार, गंगूबाई गुजरातच्या काठियावाडमध्ये राहणारी होती. त्यामुळे तिला काठियावाडी म्हटले जात असे. लहान वयात गंगूबाईला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले गेले. कुख्यात गुन्हेगार गंगूबाईकडे येत. मुंबईच्या कमाठीपुरा भागात गंगूबाई ‘कोठा’ चालवायची. या गंगूबाईने सेक्सवर्करच्या मुलांसाठी प्रचंड मोठे काम केले.
रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण...