Join us

आलिया भटने सुरू केलं 'अल्फा'चं शूटिंग, सेटवरील फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 18:15 IST

Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट तिच्या आगामी 'अल्फा' चित्रपटाच्या सेटवर स्पॉट झाली. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) तिच्या आगामी 'अल्फा' चित्रपटाच्या सेटवर स्पॉट झाली. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यावेळी अभिनेत्रीने पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हा तिचा चित्रपटामधील लूक नाही, कारण प्रोडक्शनशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. आलियाला आज सकाळी सेटवर जाताना दूरवरून क्लिक केले गेले होते. आलिया यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्स चित्रपट 'अल्फा'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पहिली फीमेल लीड YRF स्पाय यूनिव्हर्स चा चित्रपट म्हणून प्रचारित, 'अल्फा'मध्ये आलिया एक सुपर-एजेंटची भूमिका साकारत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शिव रवैल करत आहेत, ज्यांनी पूर्वी YRF ची ग्लोबल हिट आणि प्रशंसित नेटफ्लिक्स सीरीज 'द रेलवे मेन'चे दिग्दर्शन केले होते, ही सीरिज भोपाल गॅस दुर्घटनेवर आधारित आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून सिनेमाचे नाव केले होते जाहीरअलीकडेच आलिया भटच्या आगामी चित्रपटाचे (अल्फा) नाव समोर आले आहे. या चित्रपटाचे नाव आलिया भट आणि अभिनेत्री शर्वरी वाघने इन्स्टाग्रामवर सांगितले होते. शुक्रवारी ५ जुलै रोजी सकाळी, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चित्रपटाच्या नावाचा खुलासा केला होता.

स्पाय युनिव्हर्समध्ये या चित्रपटांचा समावेशYRF स्पाय यूनिव्हर्सने आतापर्यंत फक्त ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत, ज्यात 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठान' आणि 'टायगर ३' यांचा समावेश आहे. यशराज फिल्म्स स्पाय यूनिव्हर्सचा आणखी एक चित्रपट सध्या प्रोडक्शनमध्ये आहे, तो म्हणजे 'वॉर २' ज्यात हृतिक रोशन आणि एनटीआर जूनियर मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :आलिया भट