बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या एका जाहिरातीमुळे (Advertisement) चर्चेत आली आहे. एका कपड्यांच्या ब्रँडसाठी आलियाने जाहिरात केली असून हिंदू धर्मातील कन्यादान या मुद्द्यावर ती व्यक्त होताना दिसत आहे. मात्र, कन्यादानावर तिने मांडलेली भूमिका अनेकांना खटकली आहे. परिणामी, सोशल मीडियावर आता आलिया चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. केवळ ट्रोलच नाही, तर आलियाने हिंदू धर्माचा अपमान केला आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत, असेही आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत.
सध्या सोशल मीडियावर आलियाची ही जाहिरात चांगलीच व्हायरल होत आहे. या जाहिरातीत आलिया लग्नाच्या मंडपात बसली असून मुलगी दान करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे कन्यादान का करावं असा प्रश्न तिने या जाहिरातीत विचारला आहे. मात्र, कन्यादानावर तिने उपस्थित केलेला प्रश्न नेटकऱ्यांना आवडला नाही. त्यामुळेच सध्या सोशल मीडियावर आलिया आणि या कपड्याच्या ब्रॅण्डला बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.
Bigg Boss 3: बोल्ड परफॉर्मन्समुळे चर्चेत आलेल्या मिनल शाहच्या आई-वडिलांचा झालाय घटस्फोट
"हा सरळ हिंदू धर्माचा अपमान आहे",असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, "हलाल आणि तिहेरी तलाक यांसारख्या कुप्रथांविरोधात कोणी व्यक्त होत नाही. मात्र, हिंदू धर्म, परंपरांविरोधात कायमच बोललं जातं", असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
काय आहे जाहिरात?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जाहिरातीमध्ये आलिया नववधूच्या वेशात लग्नमंडपात येतांना दिसते. त्यानंतर लग्नाच्या विधी सुरु झाल्यावर आलिया कन्यादानाशी निगडीत काही प्रश्न विचारते. यात प्रत्येक कुटुंबात मुलींवर प्रचंड प्रेम केलं जातं. मात्र, लग्नाची वेळ आली की तिच कन्यादान करुन तिला सासरी पाठवलं जातं. परंतु, कोणतीही मुलगी दान करायची गोष्ट नाही. मग आपण लग्नातील विधीला 'कन्यादान' असं का म्हणतो? त्याऐवजी 'कन्यामान' असं म्हणूयात. असं आलिया म्हणतांना दिसत आहे.