आपल्या शानदार अभिनयाच्या बळावर आलिया भट्टने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेली हीच ‘चुलबुली’ आलिया आता निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. होय, एका ताज्या मुलाखतीत खुद्द आलियाने याची माहिती दिली.मी स्वत:चे एक प्रॉडक्शन हाऊस उघडले आहे. Eternal Sunshine Productions असे माझ्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे. मी एक दमदार प्रॉडक्शन प्लान आखला आहे. संपूर्ण टीम सध्या यावर काम करतेय. माझ्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत कुठल्या चित्रपटांची निर्मिती होईल, हे मात्र वेळ आल्यानंतरचं कळेल. मला जसे चित्रपट पाहायला आवडतात, तसेच चित्रपट मी बनवणार, असे आलियाने या मुलाखतीत सांगितले. या प्रॉडक्शन हाऊसची प्रत्येक लहान-सहान गोष्ट मी स्वत: जातीने लक्ष घालून बनवली आहे. अगदी फर्निचरपासून सगळ्या गोष्टी. हे माझे घर आहे आणि ते कधीच बदलणार नाही, असेही आलियाने सांगितले.
‘चुलबुली’ आलिया भट्ट बनली निर्माती! प्रॉडक्शन हाऊसला दिले हे खास नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 13:18 IST
आपल्या शानदार अभिनयाच्या बळावर आलिया भट्टने मोठा चाहता वर्ग निर्माण केला. बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेली हीच ‘चुलबुली’ आलिया आता निर्मिती क्षेत्रात उतरली आहे.
‘चुलबुली’ आलिया भट्ट बनली निर्माती! प्रॉडक्शन हाऊसला दिले हे खास नाव!!
ठळक मुद्देआलियाचा ‘गली बॉय’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील आलिया व रणवीर सिंग या जोडीने प्रेक्षकांवर जादू केली. लवकरच आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.