Join us

पत्नी आलियासाठी 'ॲनिमल पार्क' सोडणार का रणबीर कपूर? सोशल मीडियावर रंगली चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 16:48 IST

आलिया भट तिच्या 'जिगरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री आलिया भट्टचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'जिगरा' अलिकडेच चित्रपटगृहात रिलीज झाला. या चित्रपटातील आलियाच्या व्यक्तीरेखेचे कौतुक झाले. मात्र, निर्माता भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला हिने सोशल मीडियावर आलियावर टीका केली आहे. दिव्या खोसलाच्या आरोपावर आलियाने मौन बाळगले असले तरी जिगराचा सह-निर्माता करण जोहरने दिव्याला सडेतोड उत्तर दिलं. यातच आता रणबीर कपूरला नेटकऱ्यांनी या वादात ओढलं असून त्याचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

दिव्या खोसलाने आलिया भटवर 'जिगरा'ची तिकिटे खरेदी केल्याचा आरोप केल्यानंतर नेटकरी आता रणबीर कपूरच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत. पत्नी आलियावर झालेल्या आरोपांनंतर रणबीर निर्माता भूषण कुमार आणि संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'ॲनिमल'चा आगामी सिक्वेल चित्रपट 'ॲनिमल पार्क' सोडणार का? तो पत्नीची बाजू घेणार की त्याच्या प्रोफेशनल कमिटमेंट्स पाळणार, या वादाला आता तोंड फुटले आहे.

दिव्या खोसला ही 'ॲनिमल पार्क'चे सहनिर्माते भूषण कुमार यांची पत्नी आहे. दिव्या खोसलाने 12 ऑक्टोबर रोजी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे दावा केला होता की चित्रपटगृहांमध्ये कोणीही 'जिगरा' पाहत नाहीये.  केवळ मुंबईतच नाही तर इतर ठिकाणीही थिएटर रिकामे आहेत. अशा परिस्थितीत आलिया भट्टने जिगराची तिकिटे खरेदी करून बनावट बॉक्स ऑफिस कलेक्शन दाखवले. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटदिव्या कुमार