Join us  

आलियाची ‘मीशा’ सोबत डेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 9:34 AM

 मागील वर्षी आलिया भट्ट आणि शाहिद कपूर यांचा ‘शानदार’ चित्रपट रिलीज झाला. बॉक्स आॅफीसवर तो हिट झाला नाही पण, ...

 मागील वर्षी आलिया भट्ट आणि शाहिद कपूर यांचा ‘शानदार’ चित्रपट रिलीज झाला. बॉक्स आॅफीसवर तो हिट झाला नाही पण, तरीही आलिया-शाहिदची बॉण्डिंग तशीच आहे. ती ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटाच्या शुटींगसाठी सिंगापूरला जाण्याअगोदर शाहिद आणि मीरा यांची मुलगी ‘मीशा’ हिला भेटून जाणार आहे.खरंच या दोघींची भेट म्हणजे ‘डेट’च नाही का? सध्या आलिया आगामी चित्रपटासाठी शुटिंग करत असून तिचे शेड्यूल खुपच बिझी आहे. आलिया आणि शाहिद हे कपल बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत आहे. पण, आता शाहिद पुन्हा एकदा त्याचा आगामी चित्रपट ‘पद्मावती’च्या शुटींगमध्ये व्यस्त होणार आहे.