बॉलीवुडची हॉट बाला बिपाशा बासू सध्या सिनेमात झळकत नसली तरी सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रीय असते. तसेच या ना त्या कारणामुळे ती पब्लिसिटी मिळवत असते. सोशल मीडियावर बिपाशा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. पुन्हा एकदा बिपाशा बासू चर्चेत आली आहे. यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अनेकदा सेलिब्रेटी त्यांच्या आयुष्याविषयी बिनधास्त विचार मांडताना दिसतात. इतकंच काय तर बेधडक त्यांचे बेडरुम सिक्रेट्स सांगत असल्याचे पाहायला मिळते. आता बिपाशा बासूसुद्धा तिच्या खासगी आयुष्यामुळेच चर्चेत आली आहे. यावेळी बिपाशाचे बाथरुम सिक्रेट्स समोर आले आहेत. हे बिपाशाने सांगितले नसून खुद्द तिचा पती करण सिंग ग्रोवरनेच या गोष्टी उघडपणे सांगितल्या आहेत.
नुकतेच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत दोघेही मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. याच व्हिडीओतून करणने बिपाशाच्या सगळ्या सिक्रेट्सची पोलखोल केली आहे. दोघांपैकी कमी वेळा अंघोळ कोण करतं? असा प्रश्न एका युजरने विचारला.त्यावेळी करणने दिलेल्या उत्तरात थेट बिपाशाचं नाव घेतलं. सगळ्यांसमोर बिपाशाचे नाव घेतल्यामुळे तिलाही थोडा आश्चर्याचा धक्काच बसला होता.
2016 मध्ये करण सिंग ग्रोवर आणि बिपाशा बासू विवाहबंधनात अडकले होते. दोघांच्या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. करणचे हे तिसरे लग्न आहे. पहिले लग्न अभिनेत्री श्रद्धा निगमसह केले होते. या दोघांचे नाते फार काळ काही टिकले नाही. यानंतर अभिनेत्री जेनिफर विंगेटसह दुसरे लग्न केले. या दोघांच्या नात्यातही फुट पडली. त्यानंतर करणच्या आयुष्यात बिपाशाची एंट्री झाली. दोघांनीही एकमेकांच्या आवडी-निवडी जुळल्यानंतर लग्न केले होते.दोघांचाही सुखाने संसार सुरु आहे. सोशल मीडियावर दोघेही कपल गोल देताना दिसतात. एकमेकासंह क्वॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतात. दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री बघायला मिळते. लग्नानंतर दोघांचे नाते अजून घट्ट झाल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावरही हे दोघे नेटीझन्सचे फेव्हरेट आहेत.