Join us  

All Is Well, घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर- किरण एकत्र, व्हि़डीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 3:31 PM

सध्या आमिर आणि किरण ‘लाल सिंग चड्डा' सिनेमाच्या शुटींगसाठी लडाखमध्ये आहेत.तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर एरव्हीही पाहायला मिळतात. मात्र यावेळी सिनेमापेक्षा या दोघांचीच जास्त चर्चा रंगत आहे. 

आमिर खान बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने रुपेरी पडद्यावर विविधरंगी भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी जीव ओतून अभिनय करणारा अभिनेता अशी आमिरची ओळख. विशेष म्हणजे आमिर खान रिल लाईफप्रमाणे रिअल लाईफमध्ये तिकाच परफेक्ट आहे. तो जे बोलतो ते करुन दाखवतो. 

सध्या तो त्याच्या घटस्फोटामुळे जास्त चर्चेत आहे. हा शेवट नसून नव्या नात्याची सुरुवात असल्याचे म्हणत त्याने घटस्फोट घेतल्याची बातमी जाहीर केली होती. दुसरी पत्नी किरण रावला घटस्फोट दिल्यानंतरही दोघांच्या नात्यात कसलाही फरक पडलेला नाहीय. पूर्वीप्रमाणे दोघेही एकत्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कपलच्या एकत्र असण्याच्या चर्चाच जास्त रंगत आहेत.

 

आता पुन्हा एकदा आमिर आणि किरणने लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत दोघेही पारंपरिक पेहरावात डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून दोघांमध्ये आजही पूर्वीप्रमाणेच बॉन्डींग पाहायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं चाललंय तरी काय असाच प्रश्न चाहत्यांनाही पडला आहे. 

 सध्या दोघेही लडाखमध्ये आहेत. शूटिंगनिमित्त दोघेही लडाखमध्ये आहेत. त्याचदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. अनेकांना या दोघांना एकत्र पाहून आश्चर्य वाटत आहे. सध्या आमिर आणि किरण ‘लाल सिंग चड्डा' सिनेमाच्या शुटींगसाठी लडाखमध्ये आहेत.तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर एरव्हीही पाहायला मिळतात. मात्र यावेळी सिनेमापेक्षा या दोघांचीच जास्त चर्चा रंगत आहे. 

२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. 

टॅग्स :आमिर खानकिरण राव