Join us  

अल्लू अर्जुनची लेक शेअर करणार ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रीन, १० मिनिटांसाठी घेतले इतके लाख?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 3:48 PM

ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या तिसावा चित्रपट 'देवरा'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर साऊथमध्ये पदार्पण करत आहे.

एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटातून ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) खूप चर्चेत आला. सध्या तो त्याच्या तिसावा चित्रपट 'देवरा'(Devara)मुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) साऊथमध्ये पदार्पण करत आहे. आता अशी बातमी आहे की अल्लू अर्जुन(Allu Arjun)ची ६ वर्षांची मुलगी अरहा (Arha Allu) अर्जुनचे नाव देखील या चित्रपटात जोडले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती या चित्रपटात एका खास व्यक्तिरेखेत दिसणार आहे.

ज्युनियर एनटीआरचे चाहते आतापासून 'देवरा'ची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटवर लोकांच्या नजरा लागल्या आहेत. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुनची मुलगी अरहा या चित्रपटात सामील झाल्याच्या वृत्तानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'देवरा' चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतला शिवा करत आहेत आणि ज्युनियर एनटीआरचा हा तिसावा चित्रपट आहे. याचे आधी 'NTR 30' असे नाव होते. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि सैफ अली खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जान्हवीचा हा साऊथ डेब्यू सिनेमा आहे, त्यामुळे तो ५ एप्रिल २०२४ रोजी रिलीज होणार आहे.

जूनियर एनटीआरसोबत अरहा पहिल्यांदाच करणार काम आता 'देवरा' चित्रपटाबाबत मोठी बातमी म्हणजे अल्लू अर्जुनची मुलगी अरहा देखील या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसणार आहे. जूनियर एनटीआरसोबत अरहा पहिल्यांदाच काम करणार आहे. अल्लू आणि एनटीआर यांनी कधीही एकत्र काम केले नाही, पण अरहा 'देवरा'मध्ये सामील झाल्याच्या बातमीने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अल्लू अर्जुनची मुलगी अरहा नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय असते. अल्लूने ६ मार्च २०११ रोजी स्नेहा रेड्डीशी लग्न केले. अल्लूला दोन मुलं आहेत. मुलगा अल्लू अयानचा जन्म ३ एप्रिल २०१४ रोजी झाला आणि मुलगी अरहाचा जन्म २१ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला.

प्रसिद्ध स्टार किड आहे अरहा अल्लूची ६ वर्षांची मुलगी अरहा एक प्रसिद्ध स्टार किड आहे आणि तिचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. अरहाने नुकतेच समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतलम' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आता 'देवरा'च्या माध्यमातून ती तिच्या अभिनयात करिअर करणार आहे. ६ वर्षीय अरहाचा 'देवरा'शी असलेला संबंध चर्चेचा विषय आहे. यासोबतच त्याची चित्रपटाची फी देखील चर्चेत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात तिची १० मिनिटांची भूमिका असेल आणि त्यासाठी तिला २० लाख रुपये फी म्हणून दिली जाणार आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनज्युनिअर एनटीआरजान्हवी कपूरसैफ अली खान