Join us  

अल्लू अर्जुनच्या लाडक्या लेकीला पाहिलंत?, त्याच्या पत्नीची आहे हुबेहुब कार्बन कॉपी; फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 2:02 PM

डेब्यू आधीच आरहा सोशल मीडिया सुपरस्टार आहे. अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)अनेक वर्षांपासून आपल्या चित्रपटांनी लोकांचे मनोरंजन करत आहे. आता त्याची मुलगी आरहा  (Allu Arjun Daughter Arha)  देखील लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. होय, अल्लू अर्जुनची 6 वर्षांची मुलगी आरहा लवकरच साऊथची अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या शकुंतलम(Shaakuntalam)  या चित्रपटातून बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर एंट्री करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून लवकरच तो पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

समंथा रुथ प्रभूचा आगामी चित्रपट शकुंतलम सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत देव मोहन दिसणार आहे. हा चित्रपट तेलुगू भाषेतील पौराणिक नाटक आहे, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे.

या चित्रपटातील खास गोष्ट म्हणजे अल्लू अर्जुनची मुलगी आरहा या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. आरहा ही अल्लू कुटुंबाची चौथी पिढी आहे जी चित्रपटांमध्ये प्रवेश करणार आहे. आरहा या चित्रपटात राजकुमार भरतची भूमिका साकारणार आहे.

कालिदासांच्या शकुंतला या लोकप्रिय नाटकावर आधारित, शकुंतलममध्ये सामंथा रुथ प्रभू मुख्य भूमिकेत आहेत आणि पुरू राजघराण्याचा राजा दुष्यंत म्हणून देव मोहन आहे. त्याचबरोबर या चित्रपटात मोहन बाबू, गौतमी, आदिती बालन आणि अनन्या नागल्ला यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. शकुंतलमचे रामोजी फिल्म सिटी, अनंतगिरी हिल्स आणि गांडीपेट तलावासह हैदराबाद आणि आसपासच्या भागात बरेचसे शूटिंग करण्यात आलं आहे.

दरम्यान, अशीही बातमी आहे की अल्लू अर्जुनची मुलगी आरहा आणखी एका प्रोजेक्टसाठी तयार आहे. सुपरस्टार महेश बाबूच्या आगामी चित्रपटात ती एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.

अरहा आधीच सोशल मीडिया सुपरस्टार आहे. अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी आरहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

टॅग्स :अल्लू अर्जुनTollywood