साऊथचा फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu arjun) याला 'पुष्पा'च्या यशाने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं आहे. अल्लू अर्जुनच्या या सिनेमाने केवळ साऊथमध्येच नाही तर देशभरात चांगली कमाई केली आहे. पण तो जसजसा लोकप्रिय होत आहे त्याच्या ट्रोलिंगच्याही घटना वाढत आहेत. यावेळी अल्लू अर्जुन एका जाहिरातीमुळे ट्रोल होत आहे. अनेक फॅन्सनी तर त्याच्यावर टिकाही केली आहे.
अल्लू अर्जुन अलिकडेच फूड डिलीव्हरी अॅप झोमॅटोच्या जाहिरातीत दिसला होता. पण या जाहिरातीलमुळे काही फॅन्स नारात आहेत आणि अल्लू अर्जूनला म्हणत आहेत की, आपल्या मातीला किंवा मूळांना कधी विसरलं नाही पाहिजे. या जाहिरातीत साऊथ सिनेमांचं स्पूफ दाखवलं आहे. यात अल्लू अर्जुन काही गुंडांसोबत मारहाण करत आहे. एकाला तो पंच मारतो आणि ती व्यक्ती हवेत उडते.
मग गुंड अल्लू म्हणतो की, काय तो त्याला लवकर जमिनीवर लॅंड करू शकतो. कारण त्याला भूक लागलीये. अल्लू यावर म्हणतो की, हा साऊथचा सिनेमा आहे. इथे असंच होतं. मग पुन्हा गुंड त्याला म्हणतो की, त्याला गोंगुरा मटण खायचं आहे आणि जोपर्यंत तो खाली पडेल त्याआधी रेस्टॉरंट बंद होईल. अल्लू म्हणतो गोंगुरा मटण असो वा आणखी काही झोमॅटो नेहमी सोबत आहे. त्यानंतर अल्लू पुष्पातील डायलॉगही म्हणतो.
काही लोकांना अल्लूची ही जाहिरात पसंत पडली तर काही लोकांना आवडली नाही. अनेकांना वाईट वाटल्याने ते अल्लू अर्जुनला ट्रोल करत आहे. एका व्यक्तीने लिहिलं की, तुझा एक सिनेमा इतका हिट झाला तर तू साऊथच्या सिनेमालाच ट्रोल करू लागला. कुणीही पातळी विसरू नये.
तेच एका व्यक्तीने लिहिलं की, पैशांसाठी साऊथ सिनेमाची खिल्ली उडवणं कोणत्याही स्थितीत योग्य नाही. अल्लू अर्जुन आणि झोमॅटोने साऊथ इंडस्ट्रीची माफी मागावी.