Join us  

‘Pushpa ’साठी करावी लागणार बरीच मोठी प्रतीक्षा! ‘या’ दिवशी रिलीज होतोय सिनेमा....!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 4:33 PM

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’बद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. होय, ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट लीक झाली आहे...

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन  (Allu Arjun) व रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. चाहते अगदी आतुरतेने या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘पुष्पा 2’ बद्दलच्या अनेक अपडेट तुम्ही वाचल्या असतीलच. आता या चित्रपटाबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. होय, ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट आली आहे.

ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमैर संधू यांनी ‘पुष्पा 2’च्या रिलीज डेटबद्दल एक ट्विट केलं आहे. या ट्विटनुसार, अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षीत ‘पुष्पा 2’ हा सिनेमा पुढील वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर रिलीज होतोय. होय, 15 ऑगस्ट 2023 रोजी ‘पुष्पा 2’ चित्रपटगृहांत धडकणार आहे.‘पुष्पा 2’चा पहिला पार्ट सुपरडुपर हिट झाला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा लुक, चित्रपटातील गाणी, डायलॉग सगळ्यांनीच धुमाकूळ घातला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.

‘पुष्पा 2’मध्ये या सुपरस्टारची एन्ट्रीचर्चा खरी मानाल तर, या चित्रपटात विजय सेतुपतीची एन्ट्री झाली आहे. विजय सेतुपती पोलिस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार ‘पुष्पा 2’ला सुपरडुपर हिट बनवण्याच्या तयारीत आहेत आणि यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. आता या चित्रपटात विजय सेतुपतीची एन्ट्री पक्की मानली जात आहे.   

 श्रीवल्लीचा होणार मृत्यू...? चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा 2’मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे. पहिल्या पार्टमध्ये पुष्पाच्या भूमिकेतील अल्लू अर्जून   आणि श्रीवल्लीच्या भूमिकेतीज रश्मिकाला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. दोघांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रत्येकाला भावली. चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही ही केमिस्ट्री पाहण्यास मिळेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांना होती. परंतु, रिपोर्टनुसार, श्रीवल्लीच्या पात्राला दुसऱ्या भागात कमी सीन्स देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर तिचा मृत्यू दाखवला जाईल. चित्रपटातील विलन (फहाद फासिल) हा श्रीवल्लीची हत्या करतो, असं दाखवलं जाईल आणि पुष्पा याचा बदला घेईल.  आता या चर्चेत किती तथ्य आहे, हे माहित नाही. पण सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा आहे.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पाTollywoodरश्मिका मंदाना