अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ (Pushpa : The Rise) हा चित्रपट बॉक्स बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. कोरोना काळातही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली. अल्लू अर्जुनच्या अभिनयाचेदेखील चाहते कौतुक करत आहेत.‘पुष्पा’ ने पहिल्याच दिवशी 71 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि यानंतरच्या फक्त तीन दिवसांत 173 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आता हा सिनेमा ओटीटीवरही प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
होय, उद्या 7 जानेवारीला हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. अॅमेझॉन प्राईमने ट्वीटट करत ही माहिती दिली आहे. ‘ तो लढेल..तो धावेल...तो उडी मारेल...पण तो झुकणार नाही. 7 जानेवारी रोजी हा सिनेमा तेलुग, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रेक्षकांना पाहता येईल,’असं या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
पुष्पा हा चित्रपट गतवर्षी 17 डिसेंबरला रिलीज झाला आणि 2021 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अद्यापही हा सिनेमा गर्दी खेचतोय. या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरात जवळपास 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पुष्पा’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 68.19 कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा सिनेमा 75 कोटींचा आकडा पार करेल, असा अंदाज आहे.
‘पुष्पा: द राइज’ हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.