Join us  

अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 बाबत नवीन माहिती आली समोर, हिंदी प्रेक्षकांसाठी असणार खास सरप्राइज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 12:46 PM

Pushpa The Rule : देश-विदेशातील लोकांनी पुष्पातील गाण्यांवर रील्स तयार केले, डायलॉगचे व्हिडीओ केले. अशात आता या सिनेमाच्या दुसऱ्या (Pushpa The Rule) पार्टबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

साऊथ इंडियन सिनेमाची (South Indian Movies) जादू जगभरात बघायला मिळत आहे. आता ते दिवस गेले ज्यात फक्त साऊथच्या सिनेमांना साऊथमध्येच बघितलं जात होतं. आता तर साऊथचे सिनेमे देशात आणि परदेशातही धुमाकूळ घालत आहेत. अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) सिनेमाच बघा. या सिनेमाची क्रेझ तूफान बघायला मिळाली. देश-विदेशातील लोकांनी पुष्पातील गाण्यांवर रील्स तयार केले, डायलॉगचे व्हिडीओ केले. अशात आता या सिनेमाच्या दुसऱ्या (Pushpa The Rule) पार्टबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

आता 'पुष्पा' सिनेमाच्या दुसऱ्या पार्टबाबत नवा खुलासा समोर आला आहे. लेटेस्ट रिपोर्टनुसार, सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची तयारी सुरू झाली आहे. असं मानलं जात आहे की, मेकर्स दुसऱ्या पार्ट नॉर्थ इंडियन प्रेक्षक म्हणजे हिंदी प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून वेगळं काही करणार आहेत. म्हणजे पुष्पाच्या दुसऱ्या भागात नॉर्थ इंडियाशी संबंधित स्टोरी बघायला मिळू शकते. पण असं काही होईल हे इतक्यात म्हणणं घाईचं ठरेल. पण सिनेमाला नॉर्थ इंडिया आणि बॉलिवूड प्रेक्षकांना मिळालेला प्रतिसाद बघता असं काही झालं आश्चर्य वाटायला नको.

त्याशिवाय सिनेमाच्या दुसऱ्या पार्टच्या टायटलबाबत सांगायचं तर ते 'पुष्पा द रूल' ठेवण्यात आलं आहे. सिनेमाची स्क्रीप्ट तयार आहे पण त्यात आता नॉर्थ इंडियन अॅंगल आल्याने मेकर्स सिनेमाच्या स्क्रीप्टमध्ये काही बदल करण्याचा विचार करत असल्याचं समजतं. जेणेकरून एक मोठा इम्पॅक्ट आणता यावा. तेच दुसऱ्या पार्टमध्ये अल्लू अर्जुनच्या भूमिकेतही काही बदल करण्यात येणार आहेत आणि पुष्पाचे काही वेगळे शेड्स एक्सप्लोर केले जात आहेत. 

तर सिनेमाच्या कास्टबाबत सांगायचं तर यात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासोबतच काही कलाकार आहेत जे महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. पहिल्या भागाने बंपर कमाई केली आणि रेकॉर्डही कायम केले. अशात दुसऱ्या पार्टकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असणार आहेत.  

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना