Join us

Allu Arjun Video: “ये तिरंगा है, कभी झुकेगा नहीं”, अल्लू अर्जुनच्या डायलॉगने जिंकली भारतीयांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 21:02 IST

Allu Arjun New York: अल्लू अर्जुनचा न्यूयॉर्कमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो तिरंगा हातात घेऊन 'पुष्पा' स्टाईलने डायलॉग म्हणतोय.

Allu Arjun New York : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची गणना देशातील यशस्वी अभिनेत्यांमध्ये केली जाते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा'मुळे त्याच्या लोकप्रियतेने एक वेगळीच उंची गाठली. भारतासह परदेशामध्येही अल्लू अर्जुनची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. याचीच प्रचिती न्यूयॉर्कमध्ये आले. अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा रेड्डीसोबत इंडिया डे परेडमध्ये सहभागी झाला होता. तिथे अल्लूला पाहण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी जमली. एबीपी न्यूजने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अल्लूसाठी चाहते बेभान झालेले पाहायला मिळत आहेत. यातील एका व्हिडिओने, कोट्यवधी भारतीयांची मने जिंकली. व्हिडिओमध्ये अल्लू अर्जुन त्याच्या पत्नीसोबत स्टेजवर उभा आहे. यावेळी अल्लू भारताचा तिरंगा हातात घेतो आणि 'पुष्पा' शैलीत म्हणतो, 'हा भारताचा तिरंगा आहे, कधीही झुकणार नाही'. अल्लूचा हा संवाद पुष्पा स्टाईलमध्ये ऐकून लोक एकच जल्लोष करतात. 

अल्लूला पाहण्यासाठी शेकडो लोक जमलेअल्लू आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी इंडिया डे परेडमध्ये सहभागी झाले होते. अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवरही इंडिया डे परेडचे व्हिडीओ शेअर केले आहेत. अल्लू अर्जून पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर, त्याची पत्नी पिवळ्या पारंपारिक पोशाखात अत्यंत सुंदर दिसत होती. भारतीय ध्वज फडकावतानाचा एक व्हिडीओ त्याने शेअर केलाय.

टॅग्स :अल्लू अर्जुनपुष्पा