Join us

आयुषमान खुरानासोबत सान्या मल्होत्रा ह्या गाण्यावर थिरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 18:10 IST

'बधाई हो' सिनेमातील 'मोरनी बनके' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गाणे सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहे.

ठळक मुद्दे'मोरनी बनके' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला 'बधाई हो' चित्रपट १९ आॅक्टोबरला होणार प्रदर्शित

अभिनेता आयुषमान खुराना व अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट 'बधाई हो'चा ट्रेलर जेव्हापासून प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप भावला आहे. त्यामुळे हा ट्रेलर सोशल मीडियवर वायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'बधाईयां तेनू' हे गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आता या सिनेमातील 'मोरनी बनके' हे दुसरे गाणेदेखील रिलीज करण्यात आले आहे. 

बधाई हो सिनेमातील 'मोरनी बनके' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून हे गाणे सध्या सोशल मीडियावर वायरल झाले आहे. हे गाणे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. मोरनी बनके या गाण्याला पंजाबी गायक गुरू रंधावा व नेहा कक्कर यांनी स्वरसाज दिला आहे. हे गाणे एका सोहळ्यात चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात आयुषमान खुराना व सान्या मल्होत्रा ही जोडी खूप छान वाटते आहे. 

जंगली पिक्चर्स आणि क्रोम पिक्चर्सच्या बॅनरखालील विनित जैन, अलिया सेन, हेमंत भंडारी आणि अमित शर्मा यांची निर्मिती असलेल्या 'बधाई हो' हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमित रवींद्रनाथ शर्मा दिग्दर्शक असून, आयुष्यमान आणि नीना गुप्ता यांच्याबरोबरच सान्या मल्होत्राही झळकत आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विनोदी धाटणीचा कौटुंबिक चित्रपट म्हणून प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे.

टॅग्स :बधाई होआयुषमान खुराणासान्या मल्होत्रा