बॉलिवूडचे लोकप्रिय स्टारकिड सुहाना खान(Suhana Khan), खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांच्या डेब्यू चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. आज या चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला शॉट घेण्यात आला. या शॉटचा पहिला फोटो निर्माता-दिग्दर्शिका रीमा कागती यांनी तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रीमा कागती (Reema Kagti) यांनी शेअर केलेल्या फोटोवर चित्रपटाशी संबंधित काही तपशील लिहिले आहेत.
या चित्रपटातून एक-दोन नव्हे तर तीन स्टार किड्स डेब्यू करत आहेत. या तीन स्टार किड्स लाँच करण्याची जबाबदारी झोया अख्तरने घेतली आहे. झोया या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून झोया आणि रीमा कागती या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट एका लोकप्रिय कॉमिक सीरिजवर आधारित आहे.
फरहान अख्तरने नुकतेच त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट पुन्हा शेअर केली आणि टीमला शुभेच्छा पाठवल्या आहेत. दरम्यान, या चित्रपटात अगस्त्य आर्ची अँड्र्यूजच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे, तर खुशी आणि सुहाना बेट्टी आणि वेरोनिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटातून शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय जान्हवी कपूरची बहीण आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूर डेब्यू करणार आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाही बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहेत.