गेल्या अनेक महिन्यांपासून एका सिनेमाची चर्चा तो म्हणजे Kalki 2898 ad. प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण, कमल हासन अशी एक से बडकर एक तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. Kalki 2898 ad मध्ये आजवर कधीही न पाहिलेली एक अद्भूत दुनिया दिसतेय. आज हा सिनेमा भारतात रिलीज झालाय. साऊथ आणि बॉलिवूडचा खास संगम या सिनेमात पाहायला मिळतोय. त्यामुळे Kalki 2898 ad रिलीज होताच प्रेक्षकांना हा सिनेमा कसा वाटला याचे रिव्ह्यू समोर येत आहेत. चला तर पाहूया.
Kalki 2898 ad पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
सकाळपासून ज्या प्रेक्षकांनी 'कल्की 2898 एडी' पाहिलाय ते सर्व प्रेक्षक सिनेमाचं कौतुक करत आहेत. सिनेमाबद्दल बोलताना एका यूजरने सांगितले की, 'हा चित्रपट प्रभासचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. तो खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचा 'बाहुबली' असल्याचे त्याने दाखवून दिले." दुसऱ्या एका प्रेक्षकाने सिनेमाबद्दल सांगितलं की, "हा चित्रपट इतिहास आणि भविष्याचा सुंदर संगम आहे. यात महाभारत आणि भविष्य एकत्र दाखवलं आहे. जे पाहून खूप मजा येते. या चित्रपटातील प्रभासची ॲक्शन अप्रतिम आहे."
Kalki 2898 ad चा जबरदस्त क्लायमॅक्स
काही यूजर्स हा चित्रपट पाहिल्यानंतर म्हणत आहेत की, 'उद्यापासून चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होणार आहे. हा सिनेमा हॉलिवूडला टक्कर देतो.' एका ट्विटर यूजरने त्याच्या अकाऊंटवरून चित्रपटाबद्दल लिहिले आहे की, "चित्रपटाचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे. ज्याचा तुम्ही विचार करत नसाल ते या चित्रपटात घडेल." 'कल्की 2898 एडी' रिलीज झाल्यानंतर काही ट्विटर युजर्स आजचा दिवस 'नागी डे' म्हणून साजरा आहेत. नाग अश्विन सिनेमाचा दिग्दर्शक आहे. त्याला उद्देशून एका यूजरने लिहिले की, 'तुझ्यासारखा सिनेमा कोणीही बनवू शकत नाही. तुम्ही सिनेमाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता. महाभारताचे दृश्य जादुई आहे. या चित्रपटात प्रभासने कमाल केली आहे." अशाप्रकारे Kalki 2898 ad पाहून प्रेक्षकांनी कौतुक केलंय.