Join us

Mirzapur 3 Release Date: 'मिर्झापूर ३’ सीरिज कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या…

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 09:22 IST

आता 'मिर्झापूर ३' संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षक 'मिर्झापूर ३' ची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मिर्झापूर (Mirzapur) आणि 'मिर्झापूर २' हे दोन्ही पार्ट ओटीटीवर प्रचंड गाजले होते. त्यामुळे या सीरिजचा तिसरा पार्ट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.  पण आता 'मिर्झापूर ३' संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. हे कळल्यानंतर वेब सीरिजची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता दुप्पट होऊ शकते.

'प्राइम व्हिडीओ'ने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर 'मिर्झापूर ३' वेब सीरिजच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत काही पोस्टर शेअर केले. या पोस्टरमधून प्रदर्शनाच्या तारखेबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. 'इ टाइम्स'नुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'मिर्झापूर ३' सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.

'मिर्झापूर' सीरिजचा पहिला सिझन ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर दोन वर्षांनी २०२० मध्ये या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या वर्षी जून महिन्यापासून तिसऱ्या सिझनसाठी शूटिंग सुरू झालं. आता या वर्षी ‘मिर्झापूर ३’ प्रदर्शित होणार आहे. मार्च महिन्यात या तिसऱ्या सिझनची घोषणा करण्यात आली होती.

'मिर्झापूर २' मध्ये कालिन भैय्या म्हणजेच पंकज त्रिपाठीचा मुलगा मुन्ना त्रिपाठी म्हणजेच दिव्येंदू शर्मा याचा मृत्यू दाखवण्यात आला होता. तेव्हापासून वेब सीरिजचे प्रेक्षक 'मिर्झापूर ३' ची वाट पाहत आहेत. मध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल व्यतिरिक्त विवान सिंह, ईशा तलवार, शाहनवाज प्रधान, राजेश तैलांग, शीबा चड्ढा, विजय शर्मा असे अनेक कलाकार पुन्हा एकदा जुन्या पात्रांमध्ये झळकणार आहेत. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजपंकज त्रिपाठीसेलिब्रिटी