अमिषा पटेल (Amisha Patel) ने 'कहो ना प्यार है' (kahona pyar hai) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमिषासोबत हृतिक रोशन (Hrithik Roshan)दिसला होता. दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. यानंतर अमिषाने 'गदर' आणि 'हमराज' सारख्या अनेक चित्रपटात काम केले. या चित्रपटांमधील अमिषाचा अभिनयही खूप आवडला होता. आता बऱ्याच कालावधीनंतर अमिषा पटेल (Amisha Patel) पुन्हा पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'गदर 2' चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून या चित्रपटात अमीषा एकदा सनी देओलसोबत दिसणार आहे.
दरम्यान, अमिषा पटेलने एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने तिचा पहिला चित्रपट 'कहो ना प्यार है' शी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. अमिषाच्या म्हणण्यानुसार, त्या चित्रपटादरम्यान लोक तिला अहंकारी समजत होते.
अमिषा पटेलने मुलाखती दरम्यान सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला एक बिघडलेली मुलगी समजली जात होती. अमिषा पटेल म्हणाली, मला दक्षिण मुंबईतील श्रीमंत आणि बिघडलेली मुलगी म्हणून माझ्याकडे पाहिले जायचं. मी सेटवर कधीही हसले नाही आणि कोणाशीही बोललो नाही. मी माझे पुस्तक वाचत बसायचं कारण मला पुस्तकं वाचनाची आवड आहे.
अमिषा पुढे म्हणाली, 'मी माझे एक पुस्तक तीन-चार दिवसांत संपवायचे. तेव्हा लोक म्हणायचे की, अमिषा खूप गर्विष्ठ आहे. लोक मला अशी का समजाचे हे मला कळलं नाही. मी मर्सिडीजमधून शूटिंगसाठी यायचे. तेव्हाही लोक विनोद करायचे की हृतिक मारुतीवरून आला आणि अमिषा मर्सिडीजमधून आली. पण मी कधी दिखावा केला नाही.