अमिषा पटेलने तिच्या करिअरची सुरुवात 'कहो ना प्यार है' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून केली होती. यानंतर ती 'गदर' आणि 'भूल भुलैया' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली. २३ वर्षांच्या कारकिर्दीत तिने अनेक चढउतार पाहिले आहेत. मात्र, इंडस्ट्रीत अमिषा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत राहिली. विक्रम भटसोबत यांच्यासोबतच्या तिच्या रिलेशनशीपची खूप चर्चा झाली.
.विक्रम भट आणि अमिषा पटेल यांनी त्यांचे प्रेम कधीच लपवले नाही. त्यांनी अनेक वेळा जाहीरपणे आपले प्रेम व्यक्त केले होते. आता नुकतेच एकदा अमिषा पटेल विक्रम भट यांच्यासोबतच्या तिच्या नात्यावर भाष्य केलं आहे. तिने सांगितले आहे की त्यांच्या नात्याबद्दल सार्वजनिक चर्चांमुळे तिच्या करिअरचं मोठं नुकसान झालं.
अमिषा पटेल म्हणाली, "या इंडस्ट्रीत जर तुम्ही प्रामाणिक असाल तर हा प्रामाणिकपणा स्वीकारला जात नाही आणि मी खूप प्रामाणिक आहे. मी जास्त विचार करत नाही आणि मला वाटत हाच माझा मोठा प्रोब्लेम आहे. ज्यामध्ये त्या दोन नातेसंबंधांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे जी मी जाहीरपणे स्वीकारली आहे, त्यांचा माझ्या करिअरवर परिणाम झाला आणि नंतर 12-13 वर्षे मी माझ्या आयुष्यात कोणालाही येऊ दिले नाही. आता मला माझ्या आयुष्यात फक्त शांती हवी आहे."
अमिषा पटेलचे विक्रम भटसोबत चांगले संबंध होते. दोघांनी एकमेकांना ५ वर्षे डेट केले होते. अमिषा पटेलने पदार्पणापूर्वीच विक्रम भट यांची भेट घेतली होती. १९९९ मध्ये 'आप मुझे अच्छे लगने लगे' या चित्रपटादरम्यान हा प्रकार घडला होता. हा चित्रपट २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता.