Join us  

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री गीगी हदीदला अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 1:41 PM

अमेरिकन अभिनेत्री गीगी हदीदला अटक! जाणून घ्या प्रकरण

अमेरिकन मॉडेल आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री गीगी हदीदला अटक करण्यात आली आहे. गांजा बाळगल्याप्रकरणी गीगी व तिच्या मित्राला कॅमेन आयलँडवरुन १० जुलैला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्या दोघांची जामिनावर सुटकाही करण्यात आल्याची माहिती आहे. २८ वर्षीय गीगी तिच्या मित्राबरोबर प्रायव्हेट विमानाने कॅमेन आयलँडला गेली होती. तिथे ओवेन रॉबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना अचक करण्यात आली होती. 

मीडिया रिपोर्टनुसार, गीगी हदीद आणि तिच्या मित्राकडे गांजा आणि ते सेवन करण्याची साधने सापडल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. १० जुलैला गीगी आणि तिच्या मित्राजवळील सामानाची कस्टम आणि बॉर्डर कंट्रोल ऑफिसरकडून ओवेन रॉबर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे गांजा सापडल्याने दोघांनाही अटक करण्यात आली होती. १२ जुलैला एक हजार डॉलरच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. 

गीगी हदीद ही अमेरिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. एप्रिल महिन्यात पार पडलेल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनासाठी गीगी भारतात आली होती. तेव्हा तिच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तेव्हा गीगी प्रचंड चर्चेत आली होती. 

टॅग्स :अमेरिकाबॉलिवूड