रुग्णसेवेत अमेरिकेतील डॉक्टर खूप पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:11 AM
कॅन्सरशी लढा देऊन यशस्वीपणे बरी होणारी मनिषा कोईराला इतर रुग्णांसाठी एका प्रेरणादायी उदाहरण आहे. २0१२ मध्ये ४५ वर्षीय मनिषाला ...
कॅन्सरशी लढा देऊन यशस्वीपणे बरी होणारी मनिषा कोईराला इतर रुग्णांसाठी एका प्रेरणादायी उदाहरण आहे. २0१२ मध्ये ४५ वर्षीय मनिषाला गर्भायशाचा कॅन्सर झाला होता. या काळात आपल्याला आयुष्याची खरी किंमत कळाल्याचे ती प्रामाणिकपणे सांगते. ती म्हणते, 'कॅन्सर झाल्याचे कळाल्यावर मी मुंबईच्या एका मोठय़ा दवाखान्यात भरती झाले. मात्र अधिक चांगले उपचार घेण्यासाठी मी अमेरिकेत गेले. तेथील डॉक्टर न केवळ उपचारावर लक्ष केंद्रित करतात तर रुग्णांच्या मानसिकतेचीही खूप काळजी घेतात. रुग्णांची परिपूर्ण सेवा आणि उपचार करण्यात अमेरिकेतील डॉक्टर फार पुढे आहेत.''कटिंग कॅन्सर डाऊन टू झिरो' या कार्यक्रमात बोलताना तिने सांगितले की, 'कॅन्सरमुळे जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींना मी महत्त्व देऊ लागले.'