Join us  

हार्दिक पांड्याचा घटस्फोट पब्लिसिटी स्टंट? नताशाची पोस्ट पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "त्याला IPL नंतर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 3:51 PM

नताशाची ही स्टोरी व्हायरल झाली आहे. नताशाने ही स्टोरी शेअर करत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आयपीएलमध्ये मुंबईचं नेतृत्व करणाऱ्या हार्दिकला चांगली कामगिरी करता न आल्यामुळे ट्रोल केलं गेलं होतं. पण, त्यानंतर हार्दिक आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टँकोविच यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू होत्या. हार्दिक आणि नताशामध्ये घटस्फोट होणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र आता नताशाच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे त्यांच्यात आलबेल असल्याचं कळत आहे. 

हार्दिक आणि नताशामध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. तसंच ते दोघे एकत्र राहत नसल्याचंही बोललं जात होतं. पण, आता नताशाने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये मात्र ते दोघे एकत्रच राहत असल्याचं स्पष्ट झालं आहे. नताशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिने पांड्याच्या घरातील कुत्राच्या फोटो शेअर केला आहे. 'बेबी रोव्हर पांड्या' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. सोशल मीडियावर नताशाची ही स्टोरी व्हायरल झाली आहे. तिची ही स्टोरी विरल भय्यानीच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आली आहे. नताशाने ही स्टोरी शेअर करत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

पण, तिच्या या स्टोरीमुळे नेटकऱ्यांनी हार्दिक आणि नताशाला ट्रोल केलं आहे. "असं वाटतंय की हार्दिक आणि नताशाने सहानुभूती मिळवण्यासाठी हे सगळं केलं", "हे सगळं पब्लिसिटीसाठी होतं", "आयपीएलनंतर पांड्याला सहानुभुती हवी होती", "पब्लिसिटी स्टंट" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

हार्दिकने २०२० मध्ये नताशाशी लग्न केलं होतं. त्या दोघांना अगस्त्य हा मुलगा आहे. गेल्याच वर्षी हार्दिक आणि नताशाने पुन्हा थाटामाटात ग्रँड वेडिंग सोहळा केला होता. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. नताशाने इन्स्टाच्या बायोमधून पांड्याने नाव हटवल्याने आणि लग्नाचे फोटो काढून टाकल्याने त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा होत्या. पण, आता तिच्या अकाऊंटवरुन लग्नाचे फोटोही दिसत आहेत. याबाबत अद्याप नताशा किंवा हार्दिकने कोणतंही भाष्य केलेलं नाही. 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिचघटस्फोट