बॉलीवूड अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) सध्या चर्चेत आहे. तिचा 'गदर २' (Gadar 2) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अमिषा आणि सनी देओल सध्या गदर २ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अमिषाने नुकतेच एका मुलाखतीत म्हटले की, बॉलिवूड चित्रपट करणे विसरले आहे. अमिषा बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांपासून दूर होती. यामागचं कारण तिने आता एका मुलाखतीत सांगितले आहे.
अमिषा पटेलने न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भूल भुलैया, हमराज आणि हनीमून ट्रॅव्हल सारख्या चित्रपटांची पातळी जुळवणे खूप कठीण आहे. अमिषाने सांगितले की, त्यावेळी हनीमून ट्रॅव्हल प्रायव्हेट लिमिटेडसारखे चित्रपट अजिबात बनले नव्हते. फरहान अख्तर त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून एका नवीन सिनेमाची सुरुवात करत आहे.
गदर २ नंतर संधी मिळेलअमिषा पुढे म्हणाली की, तिने नेहमीच जोखीम आणि आव्हाने स्वीकारली आहेत. तिने व्यावसायिक सिनेमा तर केलाच पण त्याबाहेरच्या भूमिकाही केल्या आहेत. ती म्हणाली- मला आशा आहे की गदर२ नंतर काही चांगल्या संधी माझ्याकडे येतील. आजच्या काळात चित्रपटांमध्ये चांगल्या कथा लिहिल्या जात नाहीत. बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात असे सिनेमे बनले आहेत जे लक्षातच येत नाहीत. ती म्हणाली की, फक्त मीच नाही तर प्रत्येक कलाकाराला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. पण आजच्या काळात हे प्रमाण खूपच कमी आहे.गदर २ बद्दल सांगायचं तर या चित्रपटात अमिषा पटेलसोबत सनी देओल आणि् उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.