Join us

मुंबईत बच्चन कुटुंबाने एक-दोन नव्हे तर तब्बल १० फ्लॅट खरेदी केले, आकडा पाहून बसेल मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:18 IST

 बच्चन कुटुंबाने मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांचं कुटुंब सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतं. सध्या हे कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.  अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.  बच्चन कुटुंबाने मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केली आहे.  एक-दोन नाही तर तब्बल १० अपार्टमेंट्स खरेदी केले आहेत. 

 अमिताभ व अभिषेक यांनी ओबेरॉय रिअल्टीच्या प्रीमियम निवासी प्रकल्प इटर्नियामध्ये हे अपार्टमेंट खरेदी केले आहेत. या मालमत्तेची किंमत २४.९५ कोटी रुपये आहे.  यापैकी सहा अपार्टमेंट्स अभिषेक बच्चनने खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे. तर अमिताभ बच्चन यांनी उर्वरित चार अपार्टमेंट खरेदी केले आहेत.  या खरेदीनंतर बच्चन कुटुंबाच्या एकूण संपत्ती आणि मालमत्तेत वाढ झाली आहे.  यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत सुमारे १४.५ कोटी रुपये खर्चून १०,००० स्केअर फूट जमीन खरेदी केली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर बिग बी 'कल्की 2898' नंतर 'वेट्टियान'मध्ये दिसले होते. या सिनेमात त्यांच्यासोबत साऊथ सुपरस्टार रजनीकांतही मुख्य भूमिकेत होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. यासोबतच बिग बी टीव्हीवर 'कौन बनेगा करोडपती'चे होस्टिंग  करत आहेत. अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ते लवकरच 'बी हॅप्पी', 'आय वॉन्ट टू टॉक' आणि 'हाऊसफुल 5'मध्ये दिसणार आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनअभिषेक बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी