मुंबई: सोमवारी नवी दिल्लीत होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ््यात दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार स्वीकारण्यासाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन हजर राहू शकणार नाहीत.
तापाने आजारी असल्याने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाऊ शकत नसल्याचे स्वत: बच्चन यांनी रविवारी टिष्ट्वट करून कळविले आणि त्याबद्दल खंतही व्यक्त केली. डॉक्टरांनी प्रवास करण्यास मनाई केल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या नोव्हेंबरमध्येही ‘बिग बी’ ‘कोलकाता लिटररी फेस्टिवल’ला आजारपणामुळे जाऊ शकले नव्हते व त्यावेळी त्यांना काही दिवस इस्पितळातही दाखल केले गेले होते.दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च सरकारी सन्मान असून सुवर्णकमळ, शाल व १० लाख रुपये रोख असे त्याचे स्वरूप असते. योगायोग असा की, दादासाहेब फाळके पुरस्काराची सन १९६९ मध्ये सुरुवात झाली त्याच वर्षी ७७ वर्षांच्या अमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाने आपल्या सिनेकारकिर्दीला सुरुवात केली होती.