क्रेडिट देते तो हम भी...! अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 05:10 PM2020-12-25T17:10:28+5:302020-12-25T17:11:35+5:30
वाचा, काय आहे भानगड...
महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर किती अॅक्टिव्ह असतात, ते आपण पाहतोच. अमिताभ ब्लॉग लिहितात. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवरही रोज एक ना अनेक पोस्ट शेअर करतात. जोक्स म्हणा, कविता म्हणा, जुन्या आठवणी म्हणा किंवा सिनेमाशी संबंधित फोटो म्हणा अशा अनेक गोष्टी ते शेअर करतात. नुकतीच अमिताभ यांनी एक कविता शेअर केली आणि ही कविता शेअर करणे त्यांना महागात पडले. होय, त्यांच्यावर थेट चोरीचा आरोप लागला. आता ही काय भानगड आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर पुढे वाचा.
तर अमिताभ यांनी चहावर एक सुंदर कविता सोशल मीडियावर शेअर केली. ही कविता आणि त्याचे शब्द इतके सुंदर की, चाहते या कवितेच्या प्रेमात पडले. चाहत्यांनी अमिताभ यांचेही भरभरून कौतुक केले. पण पुढे काय झाले तर टीशा अग्रवाल नामक महिलेने ही कविता आपण लिहिल्याचा दावा केला.
टीशाने बिग बी यांच्या फेसबुक पोस्टवरही कमेंट केली. शिवाय या कवितेचे श्रेय मिळावे,मागणी केली आहे. ‘ अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याचं क्रेडिटही देत नाही..अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख..’, असे टीशाने लिहिले.
एका न्यूज पोर्टलशी बोलताना टीशा यांनी अमिताभ यांनी आपली कविता चोरल्याचा आरोप केला. ‘ मी ही कविता 24 एप्रिल 2020 मध्ये लिहिली होती. ही कविता मी फेसबुकवरही पोस्ट केली होती. माझी हीच कविता अमिताभ यांनी शेअर केली. मी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत, किमान मला माझ्या कवितेचे श्रेय मिळावे, अशी मागणी केली. त्यांची पीआर टीम याकडे लक्ष देईल, असे मला वाटले. पण माझ्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. काही लोकांनी या प्रकारानंतर अमिताभ यांना लीगल नोटीस पाठवण्याचा सल्ला दिला आहे, असे टीशा म्हणाल्या.
वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणावर अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती.