Join us

बिग बींनी असं काय सांगितलं की बदलला आयुष्याबद्दलचा दृष्टीकोन? अभिषेक बच्चन खुलासा करत म्हणाला-

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 12:44 IST

अभिषेक बच्चनला वडिलांनी एक असा सल्ला दिला होता ज्याचा त्याला खूप फायदा झाला (abhishek bachchan, amitabh bachchan)

सध्या अभिषेक बच्चनच्या I want to talk सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा माउथ पब्लिसिटीच्या जोरावर प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यास यशस्वी झालाय. अभिषेक बच्चनची आजवरची वेगळी भूमिका म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जातंय. अभिषेकच्या अभिनयाचं कौतुक होतंय. पण नुकतंच एका मुलाखतीत अभिषेकने एक खास गोष्ट सांगितली. जेव्हा संघर्षाच्या काळात वडिलांनी दिलेल्या एका सल्ल्याने अभिषेकचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. 

अभिषेकला बिग बींनी काय सांगितलेलं?

सुरुवातीच्या काळात अभिषेकचे सिनेमे इतके चालत नव्हते. तेव्हा अभिषेक वडिलांना म्हणालेला की, "क्रिटिक्स माझ्या प्रत्येक कामावर टीकाटिप्पणी करत होते. कारण त्यावेळी माझे सिनेमे इतके चालत नव्हते. त्यावेळी मी वडिलांजवळ जाऊन माझी खूप मोठा चूक झाली, मी अभिनेता नाही बनू शकत असं सांगितलं. त्यावेळी बाबा म्हणाले होते की, मी स्वतःसाठी प्रामाणिक असलं पाहिजे. याशिवाय कला फुलवायची असेल तर त्यासाठी एकच गोष्ट आहे ती म्हणजे काम करत राहाणं."

अभिषेक पुढे म्हणाला, "त्यावेळी बाबा म्हणाले होते जे सिनेमे मिळतात त्यांचा स्वीकार कर आणि काम करत राहा." वडिलांचा हा सल्ला अभिषेकने पाळला. आज अभिषेकच्या अभिनयाचं सर्वजण कौतुक करत आहेत. 'लूडो',  I want to talk अशा सिनेमांमधून अभिषेकने तो किती चांगला अभिनेता आहे हे दाखवून दिलंय. सध्या शूजित सरकार दिग्दर्शित अभिषेकचा I want to talk सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झालाय.

टॅग्स :अभिषेक बच्चनअमिताभ बच्चनबॉलिवूड