Join us

Amitabh Bachchan : 'पिंक' नंतर पुन्हा कोर्टरुम ड्रामा, बिग बींनी केली नव्या चित्रपटाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 5:03 PM

सात वर्षांनंतर पुन्हा बिग बी कोर्टरुम ड्रामामध्ये दिसणार आहेत.

Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांचा 'पिंक' (Pink) सिनेमा आजही प्रत्येकाच्या लक्षात असेल. त्यातला 'नो मीन्स नो' हा डायलॉग चांगलाच गाजला. अमिताभ बच्चन यांनी त्यामध्ये वकिलाची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. तसेच सिनेमातील कोर्टरुम ड्रामा अप्रतिमरित्या सादर करण्यात आला होता. आता सात वर्षांनंतर पुन्हा बिग बी कोर्टरुम ड्रामामध्ये दिसणार आहेत. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावरुन आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या या नव्या सिनेमाचं नाव आहे 'सेक्शन 84'. रिभु दासगुप्ता (Ribhu Dasgupta) यांनी सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. चाहत्यांसोबत माहिती शेअर करत बिग बींनी ट्वीट केले, 'पुन्हा एकदा या प्रतिभावान लोकांसोबत काम करणार आहे. नव्या आव्हानासाठी मी तयार आहे.'

'सेक्शन 84' हा एक थ्रिलर सिनेमा असणार आहे. अद्याप मेकर्सने सिनेमाच्या कंटेंटचा खुलासा केलेला नाही.  मात्र सिनेमाच्या टायटलवरुन लक्षात येते की आर्टिकल ८४ म्हणजे भारतीय दंड संहितामधील कलम ८४ मध्ये नमूद करण्यात आले आहे की, मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती नकळतपणे गुन्हा करतो तर तो कायद्याच्या नजरेत दोषी नाही. सिनेमाची स्टोरीही याच आधारावर असणार आहे. मात्र बिग बी यामध्येही वकिलाच्या भूमिकेत दिसणार का याचा खुलासा अजून झालेला नाही.

दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांनी याआधी परिणिती चोप्राच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' आणि 'कोड नेम तिरंगा' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनन्यायालयसिनेमाबॉलिवूड