महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि काल रविवारी अमिताभ यांनी सर्व चाहत्यांची हात जोडून माफी मागितली. होय, दर रविवारी अमिताभ यांच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर चाहत्यांची रीघ लागते. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते गर्दी करतात. अमिताभ बच्चन यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातमीने आधीच चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला होता. अशात त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी व त्यांची एक झलक पाहण्यासाठी काल रविवारी चाहत्यांनी ‘जलसा’बाहेर एकच गर्दी केली. मात्र यावेळी प्रकृती कारणास्तव अमिताभ या चाहत्यांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे बिग बींनी ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली.
रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अमिताभ बच्चन यांनी मागितली चाहत्यांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 1:20 PM
महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ठळक मुद्देसध्या अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये बिझी आहेत.